माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश वरील स्तर न्यायालय मंजूर

खा. तटकरे, पालकमंत्री तटकरे, आ. गोगावले, आ. तटकरेंचा सत्कार
माणगाव | वार्ताहर |
माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर करण्यासाठी सहकार्य करणारे रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आ. भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे आदी मान्यवरांचा सत्कार समारंभ माणगाव वकील बार संघटनेकडून शनिवार, दि.21 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता द.ग. तटकरे महाविद्यालय सभागृह, जिल्हा न्यायालयाजवळ, जुने माणगाव याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तराचे न्यायालय मंजूर करण्यासाठी वरील लोकप्रतनिधींनी सहकार्य केले. याबद्दल माणगाव वकील बार संघटनेकडून त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन शनिवारी सकाळी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तयारी आयोजक माणगाव वकील बार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. महेंद्र मानकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. मोहन मेथा, सचिव कौस्तुभ धामणकर, खजिनदार अ‍ॅड. योगेश आंबेतकर यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य व सभासदांनी केली आहे.

Exit mobile version