। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषद हद्दीतील मुद्रे (बुद्रुक) व नानामास्तर नगर परिसरासाठी असलेल्या स्मशानभूमीचे नव्याने बांधकाम करावे व त्या परिसराचे सुशोभीकरण करावे यासाठी आ.महेंद्र थोरवे यांनी आपल्या आमदार निधीतून 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
मुद्रे (बुद्रुक) व नानामास्तर नगर परिसरासाठी कर्जत-मुरबाड रस्त्यावर स्मशानभूमी आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्याने स्मशानभूमी रस्त्याच्या खूप खाली गेली आहे. तसेच पावसाळ्यात या स्मशानभूमीत बर्याच वेळा पाणी शिरते त्यामुळे तेथे असलेल्या लाकडांनी भरलेल्या किटा हाऊसमध्ये पाणी शिरून सुकी लाकडे भिजतात. ही स्मशानभूमी नव्याने बांधावी म्हणून मारुती बैलमारे, वसंत मोधळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने आ.महेंद्र थोरवे यांना नव्याने स्मशानभूमी बांधावी व त्या परिसराचे सुशोभीकरण करावे असे निवेदन दिले. आमदार थोरवे यांनी लागलीच 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. स्मशानभूमी व सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही. मे महिन्यात भूमिपूजन करून लवकरात लवकर चांगल्या प्रकारे काम करण्यात येईल असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
मुद्रे स्मशानभूमीसाठी निधी मंजूर
