आपटा येथे जलजीवन योजना

| आपटा | वार्ताहर |
आपटा येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जलजीवन योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना नियमित सुरु राहण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळीसरपंच नाजनीन पटेल उपसरपंच मयुर शेलार ग्रामविकास अधिकारी शेंडगे. वृषभ धुमाळ .मारुती चव्हाण व सदस्य व अँड संजय टेंबे .गणेश सांवत. स्वप्नील भोवड. गोपाळ सांवत. मृणाल कुलकर्णी. हेटवणे पाणी कमिटी अध्यक्ष सैजाद यांच्यासह योजनेचे ठेकेदार,जिल्हा परिषदेचे मिटकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत गावातील जलजीवन योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु केली आहे ती आता सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी सर्वांनीच कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या योजनेच्या माध्यमातून गावासाठी पाणी घ्यावे असे ठरविण्यात आले. या योजनेचा लाभ घ्यावा व गावासाठी पाणी पुरवठा सुरू करावे असे सर्व ग्रामस्थ यांनी सांगितले. योजना एक कोटी पन्नास लाख रुपयांची आहे.

Exit mobile version