अचर्नाला राजपथावर संचलनाची संधी

| नेरळ | प्रतिनिधी |

उल्हासनगर येथील आर के तलरेजा महाविद्यालयातील एनसीसी क्रेडर अचर्ना अभिलेख राम या विद्यार्थिनीला यंदाच्या नवी दिल्लीमधील राजपथावर संचलन करण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय प्रजासत्ताक संचलनात अर्चना सहभागी झाली होती, असा बहुमान मिळविणारी ती एमएमआर रिजनमधील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. उल्हासनगर येथील आर. के. तलरेजा महाविद्यालयाच्या अर्चना अखिलेश राम विद्यार्थिनीने दिल्लीतील राजपथावर आयोजित परेडमध्ये यशस्वी सहभाग घेतला. देशपातळीवरील या मानाच्या परेडमध्ये सहभागी होणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. या यशामागे महाविद्यालयाचे एनसीसी कॅप्टन भरत बडगुजर यांचे मार्गदर्शन आणि सततचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश काला यांनी अर्चना हिचे कौतुक केले आहे.

Exit mobile version