| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील यशवंतनगरच्या श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून अर्चना उदय खोत यांची निवड करण्यात आली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.आर. ओव्हाळ हे नियत वयोमानानुसार (दि.31) मे रोजी निवृत्त झाले. त्यांच्या जागेवर अर्चना खोत यांची सहजीवन विद्या मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमताने निवड केली. त्यानुसार मंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे व अन्य सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संचालक मंडळाने टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे सांगून मुख्याध्यापकपदासाठी निवड केल्याबद्दल अर्चना खोत यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. यावेळी संचालक कृष्णा अंबाजी, निवृत्त मुख्याध्यापक एस.आर.ओव्हाळ, निवृत्त शिक्षक उदय खोत, शिक्षक सागर राऊत, योगेश पाटील, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी संतोष बुल्लु, विद्यालयाचे लिपिक मंगेश नांदगावकर, मिलिंद मोहिते, दिपक गोसावी, सौरभ मळेकर, शांताराम वाघमारे, मनिषा शिंदे आदी उपस्थित होते.







