आर्किटेक्ट सुमित मोर्बेकरचा सन्मान

| पनवेल | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे हरिग्रामचे माजी सरपंच, माजी वनविभाग अध्यक्ष, तसेच माजी शिक्षण समिती सभापतीत नरेश गणा मोर्बेकर यांचे सुपुत्र सुमित नरेश मोर्बेकर यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आर्किटेक्ट आणि उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण करत आहेत. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

सुमितने आपले शालेय शिक्षण आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवी पनवेल येथे पूर्ण केले. त्यानंतर माहात्मा एज्युकेशन सोसायटी, खांदा कॉलनी येथे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केली. त्यांनी पिल्लई कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नवीन पनवेल येथून आर्किटेक्ट पदवी फर्स्ट क्लास श्रेणीत मिळवली असून, त्यांनी केवळ आर्किटेक्ट म्हणून नव्हे तर संपूर्ण निर्माण व विकास क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्याचा दृढ निश्‍चय केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे नेते रायगड जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक संतोष पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर खासदार निलेश लंके यांनी सुद्धा सुमित नरेश मोरवेकर यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आज संपूर्ण परिसर विकास प्रकल्पाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अनेक विकास योजना आकार घेऊ पाहत आहेत आणि अशा वेळी आपल्या आर्किटेक्चर, आधुनिक दृष्टिकोन आणि व्यावसायिक कौशल्याने या भागाचा विकास अधिक प्रभावीपणे घडवू असे सुमित नरेश मोरबेकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Exit mobile version