। नागपूर । प्रतिनिधी ।
राज्यात लोकसभेच्या निवडणुका अद्याप संपलेल्या नाहीत. मात्र, त्यापूर्वीच उपराजधानी नागपुरात महायुतीच्या दोन पक्षांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात त्याच मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेविका आभा पांडे यांनी जोरदार मोर्चा उघडला आहे. दोघांमधील वादाला कारण ठरले आहे ते रस्त्यांच्या मधोमध असलेल्या एक अतिक्रमणाविरोधात झालेली कारवाईचे आणि त्यानंतर जवळच्या एका हनुमान मंदिर आणि बौद्ध विहाराला अतिक्रमणासंदर्भातच मिळालेली नोटीसचे. या वादात आता दोन्ही बड्या नेत्यांकडून अनेक आरोप-प्रत्यारोप आणि टीकेचा फैरी झाडल्या जात आहे. त्यामुळे निकालापूर्वीच नागपुरात महायुतीत दोन नेत्यांमधील हा वाद राजकीय वातावरणात चर्चेचा विषय ठरला आहे.