अर्जुन म्हात्रे यांचे निधन

| अलिबाग | वार्ताहर |

अलिबाग येथील शेतकरी कामगार पक्षाचे लढाऊ बाण्याचे निष्ठावंत कार्यकर्ते अर्जुन गोपाळ म्हात्रे यांचे सोमवारी (दि.29) अल्पशा आजाराने निधन झाले. अर्जून म्हात्रे हे एम.एस.ई.बी. मध्ये टंकलेखक म्हणून सेवेत होते. नोकरी सोबत ते आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार शेती व्यवसाय करीत होते. त्यांना रायगड जिल्हा परिषदेने आदर्श कृषीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविले आहे. ते नवजीवन युवक क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक मंडळ, पेझारीचे ते उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 मुलं, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य शनिवारी (दि.10) त्यांच्या पेझारी येथील निवासस्थानी होणार आहे.

Exit mobile version