काशिद दुर्घटनेतील देवदूत अरमान सय्यदचा शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सत्कार

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I

मुरूड तालुक्यातील काशीद येथे असलेला जुना पुल काल रात्री ८ वाजता कोसळला. या दुर्घटनेत एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन पुलावरून खाली पडली. यावेळी अलिबाग मांडवी मोहल्ला येथे राहणारा अरमान शेहनवाज सय्यद हा युवक वाहून गेला होता. मात्र त्याला पोहता येत असल्याने तो पाण्याबाहेर आला व त्याच वेळी त्याने प्रसंगवधान राखुन पाण्यात वाहत चाललेल्या अल्टो कारची काच फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून समयसूचकता दाखवुन जीवदान दिले. या कार्याबद्दल आरमान सय्यद याचा शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.

Exit mobile version