। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा शहराचे ग्रामदैवत श्री धावीर देव महाराजांच्या या वर्षीच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रोत्सवाला तालुक्यातील भाविकांचा जनसागर लोटला होता. या यात्रेत श्री धावीर देवांची भेट घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध गावांतून मानाच्या तब्बल 15 काठ्या येत असतात. या यात्रेची खरी सुरुवात केलंटे येथील काठी आल्यानंतर होते. त्यानंतर रोहिदास समाजाच्यावतीने गावाची वेस बांधली जाते. ज्याने गावावर येणारी सर्व संकटे दूर राहतात. याला बळ काढणे असे म्हणतात. बळ काढून झाले की श्री धावीर देव महाराजांची पालखी संपूर्ण शहरातून भक्तांचा दर्शनासाठी फिरवली जाते. शनिवारी सायंकाळी पालखी पुनः मंदिरात आल्यानंतर खा. सुनिल तटकरेंच्या उपस्थितीत रायगड पोलिसांच्या बँड पथकासहीत सशस्त्र मानवंदना देण्यात आली.
यावेळी म्हसळा तालुका हिंदू समाज अध्यक्ष समीर बनकर, शहर अध्यक्ष नंदू गोविलकर, नगराध्यक्ष संजय कर्णिक, मुख्याधिकारी विनोद राठोड, योगेश करडे, भाई बोरकर, सुशील यादव, स्वप्निल चांदोरकर, महादेव पाटिल, निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर खोत, पोलीस निरीक्षक संदिप कहाले, राखी करंबे, नाजीम हसवारे, जयश्री कापरे, सुनिल उमरोठकर, सौरव पोतदार, गौरव पोतदार, मुन्ना पानसरे, अनिल पोतदार, गौरी पोतदार, मंगेश म्हशीलकर, सालकरी म्हशीलकर बंधू, बाबू बनकर, भालचंद्र करडे, सर्व हिंदू समाज सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.