सावरकर स्मारकात शस्त्रपूजन

| मुंबई | प्रतिनिधी |
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्मारकात केले जाणारे उपक्रम, त्यातील प्रशिक्षक, विद्यार्थी यांच्यावतीन दसर्‍याच्या पूर्व संध्येला खंडे नवमीनिमित्त शस्त्रपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील विविध क्रीडा उपक्रमातील प्रसिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रंथालय, दवाखाना, नृत्य, गायन, स्मारकाचे न्यूज पोर्टल हिंदुस्थान पोस्ट आदी उपक्रमातील संलग्न व्यक्तींनीही शस्त्रपूजन केले. यावेळी सावरकर स्मारकाचेे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या निमित्ताने सावरकर स्मारकातील तायक्वांदोचे राजेश खिलारी, रायफल शूटिंगचे विश्‍वजित शिंदे, मुष्टीयुद्ध प्रशिक्षणाचे राजन जोथाडी, तिरंदाजीचे स्वप्निल परब यांनी उपक्रमांच्या वाटचालीची माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय स्पर्धेतील आणि राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीबद्दल तायक्वांदोमधील यशस्वी खेळाडू, तिरंदाजीतील यशस्वी खेळाडू, रायफल शूटिंगमधील यशस्वी खेळाडूंची माहिती देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला.

Exit mobile version