श्रीनगर | वृत्तसंस्था |
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी मोहीम उघडली आहे. बुधवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील कसबयार परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. काश्मीरच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत ठार झालेल्यांमध्ये जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर यासिर पारे याचा समावेश आहे. तो आईडी तयार करण्यात तज्ज्ञ होता. याशिवाय एक परदेशी दहशतवादी होता त्याचं नाव फुरकान असं आहे. दोघेही अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते.