अर्णवने सर केला हरिहर किल्ला

। पेण । वार्ताहर ।
महाराजांचा छोटा मावळा अर्णव विशाल हेलवाडे वय अवघ्या वयाच्या 7व्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला मराठी भाषा दिन निमित्ताने चढून सर केला.

विकेंड भटकंती या ग्रुपचे टीम लीडर सुकृत घांग्रेकर यांनी अर्णवला मार्गदर्शन केले. हरिहरच्या सुळक्यावर चढून त्याने महाराजांना वंदन केले. हरिहर हा किल्ला पूर्ण दगडात कोरलेला असून चारी बाजूने दरी आहे. अर्णवने सकाळी 6 वाजता गड चढायला सुरूवात केली तर 8ः34 ला पूर्ण गड चढून ही मोहिम फत्ते केली. अजून महाराजांचे अनेक किल्ले यापुढे सर करण्याचा अर्णव याचा मानस आहे. त्याच्या सोबत त्याचे वडील विशाल हेलवाडे व पेण येथील 15 जणांचा ग्रुप प्रोत्साहन देण्यासाठी हजर होता.

Exit mobile version