बसस्थानकात बाकड्याची व्यवस्था

जैन परिवाराची सामाजिक बांधिलकी

| हमरापूर | वार्ताहर |

पेण तालुक्यातील वडखळ बसस्थानकात पोयनाड येथील जैन परिवारातर्फे प्रवाशांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

वडखळ बस स्थानक हे मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे असून, रायगड जिल्ह्यासह तळ कोकणात जाणार्‍या एसटी बसेस येथे थांबतात. वडखळ परिसरात जेएसडब्ल्यू, इंडोरामा जॉन्सन या कंपन्या आल्यामुळे या भागात सतत वर्दळ असते. अनेक कामगार नोकरीच्या निमित्ताने येथून ये-जा करतात. नुकतेच वडखळ बसस्थानकाचे सिमेंट काँक्रिटीकरणदेखील करण्यात आले आहे. मात्र, या बसस्थानकात अलिबाग, पाली फलाटावर प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांना गाडीच्या प्रतिक्षेत उभे राहावे लागत होते. हे पाहून पोयनाडमधील स्व. शांताबाई छगमालजी जैन यांची मुले प्रकाश जैन, निर्मला जैन, संजय जैन, संतोष जैन यांनी प्रवाशांना बसण्याचे बाक देऊन बसण्याची सोय केली आहे.

पेण एसटी आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक व वाहतूक नियंत्रक अनंत सूर्यवंशी यांनी याबद्दल प्रकाश जैन व त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानून, त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

Exit mobile version