। नागोठणे । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह दि. 19 व 20 मार्च, 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला होता. सार्वजनिक पाणवठा बहुजन समाजासाठी खुला झाल्याने चवदार तळे सत्याग्रह दिन दरवर्षी 20 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून महाड येथे लाखोंच्या संख्येने भिमसैनिक येत असतात. या सत्याग्रहाचा यावर्षी 97 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी लाखों भिमसैनिक महाड येथे जात आहेत. त्यामुळेच मुंबईहून महाड येथे जाणा-या समाज बांधवांसाठी नागोठणे विभाग बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 3 यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे येथील हायवे नाका येथे सकाळी नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक समाज बांधवांनी या ठिकाणी थांबून नाश्त्याचा आस्वाद घेत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
याप्रसंगी एस.एन.गायकवाड, किसन शिर्के, प्रभाकर ओव्हाळ, निलेश शेलार, विकास जाधव, विलास कांबळे, संतोष गायकवाड, भगवान बिनेदार, बबन झेंडे, अॅड.प्रकाश कांबळे, रमेश गायकवाड, हेमंत जाधव, सुरेश कांबळे, जगदीश वाघमारे, संदिप मोहिते, सुदिन शिर्के, देवराम कांबळे, दिपक दाभाडे, अल्पेश शेलार, सुरेश कांबळे, मनोहर शेलार यांच्यासह नागोठणे विभागातील समाज बांधव उपस्थित होते.