नारायण राणे आणि नितीन गडकरी यांची आक्रमक भूमिका; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
। मुंबई । वृत्तसंस्था ।
रविवारी सायंकाळी घेतलेल्या प्रचार सभेत काँग्रेस प्रदेशाध्क्ष नाना पटोले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर नाना पटोले यांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली होती “मी आमच्या एका गाव गुंडाबद्दल बोलत होते, त्याच नाव मोदी आहे. तुम्हाला कोणता मोदी म्हणायचा आहे” असा प्रश्न केला होता. यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितीन गडकरी यांनीसुद्धा ट्विट द्वारे अटकेची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे ट्विटद्वारे म्हणाले, ” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा मी निषेध करतो काँग्रेस नेते या पातळीवर घसरले याचे मला आश्चर्य वाटत नाही” सोबत राणे आणखी एक ट्विट करीत म्हणाले, “नाना पटोलेंना अटक करावी, हि पोलिसांची जबाबदारी आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे.”