| म्हापसा | वृत्तसंस्था |
दोन महिला फुटबॉल खेळाडूंचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा कार्यकारी समिती सदस्य हिमाचल प्रदेशमधील दीपक शर्मा यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला व त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी हिमाचल प्रदेशातील खाड फुटबॉल अकादमी या क्लबची 21 वर्षीय महिला खेळाडू ही तक्रारदार आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, संशयिताने सदर कृत्य केले तेव्हा तो दारूच्या नशेत होता.
विनयभंग करणार्या प्रशिक्षकास अटक
