दारूचे साहित्य बाळगणार्‍यांना अटक

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी आणि मुरुगवाडा किरवाडी या ठिकाणी बेकायदेशिरपणे गावठी दारू आणि दारुचे साहित्य आपल्या ताब्यात बाळगणार्‍या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण 1 लाख 82 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (दि.19) करण्यात आली. मयूर रवि मोरे (38) आणि विलास एकनाथ चव्हाण (54,) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.

Exit mobile version