धडक मारून पसार झालेल्याला अटक

। पनवेल । वार्ताहर ।

भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून एका पदचार्‍याला धडक मारून पसार झालेल्या मोटारसायकल स्वाराला पनवेल शहर पोलिसांनी नावावरून सखोल तपास करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

करंजाडे सनसेट पॉईंट पुलाजवळ आरोपी मोहम्मद सादिक अन्सारी (21) याने चंद्रकांत हणमंतराव पट्टण यांना अपघात करून स्वतः पुढे जाऊन धडकून तो व त्याचा सहकारी जखमी झाला. यावेळी परिसरात असणार्‍या लोकांनी या तिघांना तातडीने एमजीएम कामोठे रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, तेथील आयसीयूजवळ उभे असलेल्या पाहरेकर्‍याला मोहम्मद अन्सारी याने आले नाव सांगून तो तेथून निघून गेला. दरम्यान, चंद्रकांत पट्टण यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजरत्न खैरनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत आहिरे, पोलीस नाईक संतोष कोळंबेकर आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेत तेथील पाहरेकर्‍याने सांगितलेल्या नावावरून कळंबोली व रोडपली परिसरात शोध घेतला व संबंधित आरोपीच्या भावाची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन या गुन्ह्या संदर्भात माहिती दिला असता त्यानी आपल्या भावाला बिहार येथील मूळगावी लपवले असल्याचे तसेच गुन्ह्यातील गाडी ही रोडपाली गणेश पार्किंग येथे लपवली असल्याचेही सांगितले. त्यानुसार पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली व आरोपीला बिहार येथून ताब्यात घेण्यात आले.

Exit mobile version