| सोगाव | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यतील विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी आपला संकल्प विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून जनजागृती सातिर्जे ग्रामपंचायतीत गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी आपला संकल्प विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी यात्रा रथातील चित्रफितीद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांच्या समृद्धी व उन्नतीसाठी असलेल्या सर्व प्रकारच्या योजना व त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली महत्वाची माहिती देण्यात आली. तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनांची माहिती देण्यात आली. आदिवासी बांधवांसाठी व दारिद्य्र रेषेखालील गरीब नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना, महिला बचतगट योजना, भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना, किसान क्रेडिट कार्ड, आभा कार्ड, प्रधानमंत्री उज्वला योजना, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध योजना, हर घर नळ योजना अश्या अनेक योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
या कार्यक्रमास जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, गटविकास अधिकारी डि. एच दाईंगडे, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश पाटील, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी डि. एल. सालावकर, आरोग्य अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक पूजा पाटील, माजी जि.प. सदस्य काका ठाकुर, प्राजक्ता खडपे, प्रसन्न खडपे, सातिर्जे ग्रामपंचायत सदस्य व सदस्या, शासकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, राजिप शाळा कातळपाडा – मुख्याध्यापक, व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
भारत यात्रा रथाचे आगमन
