| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुडमध्ये देशी-विदेशी पर्यटक हे मुरुडमध्ये दाखल होऊ लागले आहेत. गेल्या महिन्याभरात शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली होती. स्थानिक हॉटेल्स, लॉजींग, घरगुती खाणावळीवर मोठा फटका बसल्याने व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले होते.
अद्यापही पर्यटकांची लक्षणीय गर्दी नसल्याने व्यवसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दिवाळी जवळ आली तरी बुकींग झाले नसल्याचे लॉजिंग व्यवस्थापक कुणाल सतविडकर यांनी सांगितले.
रस्ते सुस्थितीत नसल्याने पर्यटकांची संख्या रोडावत असल्याचा दावा त्यांनी केला. असे असले, तरी काही प्रमाणात विदेशी पर्यटक येऊ लागल्याचेे दिसून येते. दिवाळीच्या हंगामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येतील आणि येथील पर्यटनावर आधारीत उद्योग भरभराटीला येईल, अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली.