किल्ले रायगड | विशेष प्रतिनिधी |
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांचे नुकतेच रायगडावर आगमन झाले. त्यांच्या समवेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उपस्थित होते. रायगड किल्ला विकास प्राधिकरण अध्यक्षखासदार छत्रपती संभाजी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी उपस्थित होते.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या, अवघ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आदराचे स्थान असलेल्या किल्ले रायगडाला भेट देऊन शिवप्रभुंना अभिवादन करण्यासाठी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सोमवारी (6 डिसेंबर) किल्ले रायगडावर आले आहेत. त्यांच्या या दौर्याची महाराष्ट्र शासन, किल्ले प्राधिकरण यांच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. दौर्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगड आणि रायगडच्या पायथ्याला सुरक्षा यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.