कलाकार निवडणुकीच्या आखाड्यात

| मुंबई | वृत्तसंस्था |

शिंदेंच्या शिवसेनेकडून अभिनेता गोविंदाला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरु आहे. अशातच काँग्रेसकडून अभिनेत्री स्वरा भास्कर गोविंदा विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. स्वरा भास्कर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. स्वरा भास्करच्या उमेदवारीबाबत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघातून पुन्हा एकदा पूनम महाजन निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत. या मतदारसंघातून शिंदे गट अभिनेता गोविंदाला मैदानात उतरवण्याच्या विचारात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन विरुद्ध स्वरा भास्कर अशी लढत दिसू शकते किंवा गोविंदा विरुद्ध स्वरा भास्कर अशी लढतही पाहायला मिळू शकते.

रशियात पुन्हा ‘पुतिन’राज
नवी दिल्ली: रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांनी सुमारे 88 टक्के मतांनी दणदणीत विजय नोंदवला आहे. सलग पाचव्यांदा पुतिन पुन्हा रशियाची सूत्रं हाती घेणार आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. व्लादिमीर पुतिन 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक हरलेली नाही.
Exit mobile version