गतीमंद विद्यार्थ्यांची कलाकृती

| पाताळगंगा | वार्ताहर |

शालोम एज्युकेशन सेंटर संचालित सोफिया गतिमंद मुलांची शाळा खोपोली शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक पणत्या व कंदील बनवून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

शाळेच्या उपाध्यक्षा रूपा मजेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली येथे गतिमंद मुलांची शाळा सुरू आहे. यामध्ये तीस विद्यार्थी प्रशिक्षण लाभ घेत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभा पाटणकर यांनी स्वतः मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना मागील वर्षीप्रमाणे मुलांना प्रोत्साहन देऊन विविध वस्तू तसेच अन्य वस्तूंची निर्मिती करण्यात आली. तसेच, शाळेतील शिक्षक साक्षी पवार, मंजू बोडके, कर्मचारी दुर्गा दबडे, रुचिता सावंत, जयकुमार म्हात्रे या सर्वांच्या मदतीने या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.

या शाळेतील मुले वर्षभर दिवाळीचे व अन्य साहित्य बनवत असतात पेपर डिश, अगरबत्ती, आकाशकंदील, राखी, लिफाफे, उटणे, फुले, न्यूज पेपर बॅग, मेणबत्ती, पणत्या, बुके अशा अनेक वस्तू दिवाळी मेळावा लोहाना हॉल व याक स्कूल येथे स्टॉल प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.

Exit mobile version