। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील राजिप साखर शाळेतील विद्यार्थीनी अर्वा चिखले हिने बुधवारी (दि.16) झालेल्या प्रज्ञा शोध अंतिम परिक्षेत 300 पैकी 272 गुण मिळवून रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. रायगड जिल्हा परिषद आणि रायगड प्रज्ञा शोध परीक्षा टिम यांच्या संयुक्त विद्यमाने या परिक्षांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण वर्षभरात 6 सराव परीक्षा, एक पात्रता निवड परीक्षा आणि एक अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. या टीमचे पदाधिकारी रत्नाकर पाटील, उमेश ठाकूर आणि दिलदार थळे तसेच इतर सदस्य यांच्या विशेष प्रयत्नांमुळे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, संतोष शेडगे, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, नितिश पाटील, तालुका शिक्षण सल्लागार समिती सदस्य नितीन पाटील, नागाव केंद्रप्रमुखा प्राची ठाकूर व सर्व केंद्र प्रमुख, साधन व्यक्तीशाळा व्यवस्थापन समिती साखर व मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, स्मता चिखले, तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद यांच्याकडून तिचे कौतुक करण्यात आले आहे.