आर्यन खानला NCB कडून अटक

मुंबई | प्रतिनिधी |

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ताब्यात घेतले आहे. मुंबई किनारपट्टीवरील क्रूझ जहाजावर अधिकार्‍यांनी छापा टाकल्यानंतर शनिवारी रात्री झालेल्या रेव्ह पार्टीच्या संदर्भात एनसीबी आर्यन खानची चौकशी करत होते. त्यानंतर एनसीबीने आर्यनची दीर्घ चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली आहे. त्याच्यासोबत इतर दोघांना एनसीबीने अटक केल्याचे समोर येत आहे.

यावेळी एकूण आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची मुंबईतील एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर अनेकांनी ते सर्वजण पार्टीचा भाग असल्याची कबुली दिली आहे. तर काही जणांकडे ड्रग्स सापडल्याचेही बोललं जात आहे. यामुळे एनसीबीने आता आर्यन खानसह दोघांना अटक केली आहे. आर्यनला अटक केल्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं आहे.

अन्वेषण केलेल्या इतरांमध्ये मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने अटक केली आहे. तर इतर पाच जणांची अद्याप चौकशी सुरु आहे. ही क्रूझ मुंबईहून गोव्याकडे जात होती.

Exit mobile version