। मुंबई । प्रतिनिधी ।
किंगखानच्या मुलाला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतले होते. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता आर्यन खानसह 3 आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना दिलासा मिळालेला नाही. सुनावणीदरम्यान हे देखील समोर आले आहे की आर्यन खानच्या फोनमध्ये आक्षेपार्ह चॅट सापडले आहेत. याशिवाय एजन्सीकडून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी मुंबईत सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकला. याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या सर्वांची रविवारी संध्याकाळपर्यंत चौकशी करण्यात आली त्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह सर्व आरोपींना अटक करण्यात आली. आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी करण्यात आली.