आर्यन पानावकर रायगड संघाचा कर्णधार

क्रिश बहिरा उपकर्णधार

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेलया आमंत्रित संघांच्या 16 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडचा 16 वर्षांखालील मुलांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. आर्यन पानावकर याच्याकडे रायगडच्या 16 वर्षांखालील मुलांच्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. क्रिश बहिरा याची उपकर्णधार पदी निवड करण्यात आली आहे.

पहिल्या दोन सामन्यांवाठी 14 जणांचा संघ निवडण्यात आला आहे. पाच खेळाडूंची राखीव म्हणून निवड करण्यात आली आहे. हा संघ पुण्यात होणार्‍या स्पर्धेत सहभागी होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी विभागीय संघ निवडण्यात आले आहेत. महाराष्ट्र पश्‍चिम विभाग संघात रायगडच्या पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा नाशिक येथे खेळली जाणार आहे.

16 वर्षांखालील मुलांचा संघ: आर्यन पानावकर (कर्णधार), क्रिश बहिरा (उपकर्णधार), विघ्नेश पाटील, जिग्नेश म्हात्रे, श्‍लोक कोळी (यष्टरक्षक), हर्षल म्हात्रे, पंकज इटकर, मिलन चौरसिया, अमेय भोसले, श्‍लोक पाटील, हृषिकेश पिंपळकर, परिन झिंजे, आर्यन जाधव, विनित भोईर
राखीव खेळाडू: आर्यंक जाधव, आरुष जाधव, मिथिलेश म्हात्रे, अनुराग दुबे (यष्टीरक्षक), विस्मय बल्लाळ, श्रीयांश ठाकूर
पश्‍चिम विभाग संघात निवड झालेले खेळाडू: पृथ्वीराज जवके, प्रणिकेत पाटील, युवराज ठाकूर, ॠतुराज पाटील, तृषभ गावंड, श्‍लोक म्हात्रे
Exit mobile version