पुणे-मुंबई महामार्गावर तब्बल 12 किमीच्या रांगा

सलग सुट्ट्यांचा परिणाम

| खोपोली | प्रतिनिधी |

पुणे-मुंबई एक्स्प्रेेस हायवेवर शनिवारी सकाळपासूनच वाहनांच्या खंडाळा बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक संथगतीने सुरू होती. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर गेल्या काही दिवसांपासून दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. ते आता सुरळीत झाले असून पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. सलग सुट्ट्या आल्याने प्रवासी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने सकाळपासूनच खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू राहिली. 12 किमीच्या रांगा लागल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. मागच्या महिन्यामध्ये घाट परिसरात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण देखील वाढले होते. त्यानंतर प्रशासनाकडून त्वरित दखल घेण्यात येऊन दरडी हटवले गेल्या. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र आतामात्र सलग सुट्टी आल्याने अनेक नागरिक घराच्या बाहेर पडत असून एक्स्प्रेस वे ने प्रवास करतात. त्यामुळे खंडाळा घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तासनतास वाहने एकाच जागेवर उभी होती.

Exit mobile version