तब्बल आठ कोटींची चांदी जप्त

खालापूर पोलीस व भरारी पथकाची धडक कारवाई

| रसायनी | वार्ताहर |

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना जागोजागी पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाकाबंदी करण्यात येत असताना खालापूर टोलनाक्यावर एमएच 01. ईएम 8775 क्रमांकाचा पिकआप टेम्पो खालापूर पोलीस व भरारी पथकाला संशयित आढळल्याने या टेम्पोची तपासणी केली. यावेळी तब्बल आठ कोटी रुपयांची चांदी वेगवेगळ्या स्वरूपात लपून ठेवलेली आढळली. ही तपासणी खालापूर टोलनाक्यावर झाली.

खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना खात्रीशीर माहिती मिळाली, तेव्हा ही कारवाई करण्यात आली. खालापूर पोलीस व भरारी पथकाने ही कारवाई केली. या टेम्पोत 171 कुरिअर बॅगमध्ये लपवण्यात आलेल्या जवळपास आठ कोटी रुपयांची चांदी जप्त करण्यात आली आहे. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास खालापूर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version