सुधागड तालुक्यातील आसरे-कासारवाडी स्वप्नातील गावं

स्वदेस फाउंडेशनचे सहकार्य
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
काही माणसं जशी स्वकष्टातून उभी राहिलेली असतात तशीच काही गाव ही एखाद्याचं प्रेरणादायी नेतृत्व मान्य करीत, त्याला पाठिंबा देत कष्ट उपसतात आणि या सगळ्याच्या एकत्रित प्रयत्नातून उभं राहातं एक गाव ते म्हणजे आसरे कासारवाडी. अशाच कष्टातून उभ्या राहिलेल्या आणि विकासाच्या उर्जेने स्वंयप्रकाशित झालेल्या नवघर ग्रामपंचायतमधील आसरे कासारवाडी हे गाव.स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वदेस फाउंडेशन जिल्हामध्ये 75 स्वप्नातील गावे बनवत त्यामधील आसरे कासारवाडी हे गाव अग्रगण्य आहे .
अवघ्या 101 उंबरर्‍याचं आणि 507 लोकसंख्येचं हे गाव. पाली पासून 16 कि.मी अंतरावरच्या या गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे, तसेच गावातील 35-40 घरातील महिला पापड बनवून जवळपासच्या मोठ्या बाजारपेठेत स्वतःच नाव बनवल आहे , सोबतच 4 शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला सुद्धा करत आहेत , तसेच 65-70 % घरातील तरुण मुलं मुली मुंबई – पुणे येथे काम करत आहेत आणि आपलं व आपल्या घराच्या वार्षिक उत्पन्नात वाढ करीत आहेत. गावात 1 शुद्ध लघु पाणी पुरवठा योजना, 2 विहिरी आणि 3 बारमाही हातपंपासह एकूण 30 पथदिवे आहेत त्यातील 12 दिवे सौरउर्जेवरचे आहेत या गावात 7 बचतगट स्थापन झाले असून ती सर्व ऑनलाईन नोंदणी झालेली आहेत. त्यातून गावातील महिलांनी स्वंयरोजगाराची वाट धरली आहे. गावात पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा व एक अंगणवाडी असून एकही विद्यार्थी शाळा बाह्य नाही आहे. गावात जवळपास हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या वृद्ध व्यक्ती सोडल्या तर संपूर्ण गाव साक्षर आहे.
गावातील सर्व जेष्ठ नागरिक, गावकी पदाधिकारी, गावं विकास समिती , शासन आणि स्वदेस फाऊंडेशन सारख्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणादायी वाटचाल करीत असले तरी या सर्व पायाभरणीत गावकर्‍यांचा सहभागही तितकाच मोलाचा आहे. आपल्या स्वप्नातील गाव बनवण्यासाठी गावातील समस्यांचा सखोल अभ्यास करून गावाचा नियोजित गावं विकास आराखडा तयार करण्यात आला. आजअखेर नियोजित गावं विकास आराखड्याच्या वाटचालीने काम करत असताना स्वतः गावातील ग्रामस्थ, शासन व स्वदेस फाउंडेशन यांच्या सहकार्याने गावातील लोकांनी गावामध्ये बहुतांश विकास कामे पूर्ण केली आहेत. सदर विकास कामे पूर्ण करत असताना ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा तेवढ्याच तत्परतेणे गावातील विकास कामांना हातभार लावला आहे. आज या विकास कामांच्या अनुषंगाने व गावं विकास समिती यांच्या प्रयत्नाने संपूर्ण गावं हे हागणदारी मुक्त आहे, तसेच आदर्श गावाकडे वाटचाल करत असताना गावातील लोकांसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, प्रत्येक कुटूंबाकडे बँक खाते, गरीब व गरजू लोकांना शासकीय पेन्शन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पथदिवे, आर्थिक साक्षरता च्या अनुषंगाने गावातील गावातील महिलांनी व लहान मुलांनी केलेली बचतीची सुरुवात, गावातील लोकांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी उपजीविकेची साधन उपलब्ध करून देणे, गावातील लोकांना प्राथमिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, मुलांच्या शिक्षणाप्रति लोकांमध्ये जागरूकता, निसर्गाप्रति आपुलकी जपत असताना दरवर्षी वृक्षलागवड करणे व वनांचे संरक्षण करणे इत्यादी आज अश्या बाबी जोपासात, विविध गोष्टींनी परिपूर्ण असे कासारवाडी गावं आदर्श गावाकडे वाटचाल करत आहे.
गावाच्या या प्रवासामध्ये गावातील लोकांची जिद्द व चिकाटी तसेच शासन व स्वदेस फाउंडेशन यांचे बहुमोल असे मार्गदर्शन व सहकार्य आहे. भविष्यात आपल्या गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श गावांच्या यादीमध्ये घेतले जाईल या अनुषंगाने गावं विकास समिती व ग्रामस्थ मिळून प्रयत्न करत आहेत.

Exit mobile version