आशा सेविकांचा संप मागे!

मुंबई | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ङ्गआशाफ आरोग्य सेविकांनी मानधनाच्या मुद्द्यावर आंदोलन छेडलं होतं. तसेच, सरकार दरबारी दखल घेतली जात नसल्यामुळे आशा संपावर गेल्या होत्या. मात्र, अखेर राज्य सरकारला आशांसमोर झुकतं घ्यावं लागलं असून त्यांना मानधन आणि कोविड भत्ता देण्याचं सरकारने मान्य केलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या आशा कृती समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून या तोडग्यानंतर संप मागे घेत असल्याचं समितीच्या पदाधिकार्‍यांनी जाहीर केलं आहे. आपल्या मागण्यांसाठी राज्यातील जवळपास 70 हजार आशा व गटप्रवर्तकांनी 15 जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला होता.

Exit mobile version