आशिष शेलार पोलीस स्टेशनमध्ये दाखल; शिवसैनिक आक्रमक भूमिकेत

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भाजपचे आमदार अशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकरांबद्दल वक्तव्य केल्याने नव्या वादाने जन्म घेतला आहे. या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याने शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस शेलार यांना अटक करणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत होता.
अखेर आशिष शेलार यांनी मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशन मध्ये उपस्थिती लावली. त्यांना ऑनटेबल जामीन मिळणार असल्याचं स्पष्ट झालं. आमदार प्रसाद लाड हा जामीन मंजूर करणार आहेत. मात्र, या प्रकरणामुळे शेलार यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. तसेच पोलीस स्टेशनच्या बाहेरही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
प्रसाद लाड हे देखील शेलार यांच्या पाठिशी आहेत. आम्ही या घटनेचा निषेध करतो. शेलार यांना टेबल जमीन केली जाईल, असं लाड यांनी सांगितलं. आशिष शेलार यांच्यावर दाखल झालेला गुन्हा पोलिसांवर दबाव टाकून करण्यात आला आहे. आगे आगे देखो होता है क्या, आधी जामीन मिळू द्या, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. आम्ही अटकेला घाबरत नाही. आता रणशिंग फुंकलेलं आहे, असंही ते म्हणाले.

Exit mobile version