काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अशोक गहलोत यांची माघार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आल्यानंतर राजस्थानमध्ये मोठा राजकीय ड्रामा पहायला मिळाला होता.

अशोक गहलोत यांनी दिल्लीत हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर गहलोत यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. सध्या निर्माण झालेला राजकीय पेच पाहता मी अध्यक्षपदाची निवडणुक लढवणार नाही असे गहलोत यांनी जाहीर केले.

एक व्यक्ती, एक पद हे कॉंग्रेसचे धोरण असल्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गहलोत यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. मात्र, आता अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद सुरक्षित राहणार असल्याची चर्चा आहे.

Exit mobile version