। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हददीतील केगाव-दांडा या गावातील कॉमेडी,मिमिक्री गायक व नाटककार अशोक रघुनाथ म्हात्रे यांचे बुधवार (दि.6) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यु समयीं त्यांचे वय 69 वर्षे होते.त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुलगे,मुलगी, सात बहिणी तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.15 जुलै रोजी केगाव-दांडा स्मशानभूमी येथे सकाळी 8.30 वाजता होणार आहे तर दिवसकार्य रविवार (दि. 17) रोजी राहत्या घरी दांडा येथे होणार आहे. विशेष म्हणजे ते अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची मिमिक्री करत त्यांच्या सिनेमातील गाणी गात असत. महाराष्ट्र नाट्य स्पर्धेत त्यांनी विविध नाटकामध्ये काम करून विविध पारितोषिके मिळविली होती.