। नवी दिल्ली । वार्ताहर ।
शुबमन गिल याला आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. गिल याच्या कसोटी आकडेवारीपेक्षा फिरकी अष्टपैलू खेळाडू आर आश्विन याची फलंदाजीची आकडेवारी चांगली आहेशुबमन गिल याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत कसोटी सामन्यांच्या 35 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. पण गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या आर अश्विन याने कसोटीच्या पहिल्या 35 डावात गिलपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आतापर्यंतच्या कारकिर्दीत गिलने 19 सामन्यांच्या 35 डावांमध्ये 31.06 च्या सरासरीने 994 धावा केल्या आहेत. पण त्याचवेळी अश्विनने कसोटीच्या पहिल्या 35 डावात 1006 धावा केल्या होत्या. म्हणजेच 35 डावांनंतर अष्टपैलू अश्विनने सलामीवीर फलंदाज शुबमन गिलपेक्षा 12 धावा जास्त केल्या होत्या.







