अश्‍विनने उंचावली टीएनपीएलची ट्रॉफी

। चेन्नई । वृत्तसंस्था ।

आर अश्‍विनच्या नेतृत्वाखाली दिंडीगुल ड्रॅगन्सने 6 गडी राखून विजय मिळवत तामिळनाडू प्रीमियर लीग विजेतेपद जिंकले. त्यांनी रविवारी (दि.4) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर टीएनपीएल 2024च्या अंतिम सामन्यात गतविजेत्या लायका कोवई किंग्स संंघाचा धुव्वा उडवला.

दिंडीगुल ड्रॅगन्सने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात प्रथम फलंदाजी करताना लायका कोवाई किंग्जने 20 षटकांत 7 बाद 129 धावा केल्या. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना कर्णधार रविचंद्रन अश्‍विनेन 46 चेंडूत 52 धावा करत अंतिम सामन्यात 10 चेंडू शिल्लक असताना ड्रॅगन्सला विजय मिळवून दिला. बाबा इंद्रजीथ 35 चेंडूत 32 धावा आणि शरथ कुमार 15 चेंडूत नाबाद 27 धावा अशी फलंदाजी करत संघाला मोलाचे योगदान दिले.

लायका कोवाई किंग्जकडून गोलंदाजी करताना गौतम तामराय कन्नन, मणिमारन सिद्धार्थ, वालियाप्पन युधिश्‍वरन आणि कर्णधार शाहरुख खान यांन प्रत्येकी 1-1 बळी घेतला. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना लायका कोवाई किंग्जसाठी सुरेश कुमारने (11) धावा केल्या. लायका कोवई किंग्जने 51 धावांपर्यंत 4 बळी गमावले होते. साई सुदर्शनने 14 चेंडूत फक्त 14 धावा केल्या. राम अरविंदने सर्वाधिक 27 धावांची खेळी खेळली आणि अतिक उर रहमानने 25 धावा केल्या, तर कर्णधार शाहरुख खानच्या हाती केवळ निराशाचं लागली.

Exit mobile version