आशिया अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

दोन भारतीय डोपिंगमध्ये अडकले

| बँकॉक | वृत्तसंस्था |

आशियाई अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या पुरस्कार सोहळ्यात भारतीय थलेटिक्स महासंघाला आशियातील सर्वोत्तम थलेटिक्स महासंघाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच वेळी भारतीय संघातील तीन प्रमुख खेळाडूंनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले. या धक्क्यातून भारतीय संघ सावरत नाही, तोच आणखी दोन खेळाडू डोपिंगमध्ये अडकल्याचे वृत्त आले. असे असूनही 24 व्या आशियाई थलेटिक्स स्पर्धेत भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.

आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला 1973 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून भारताने प्रत्येक भाग घेतला आहे. गेल्या वेळी दोहामध्ये दोन सुवर्णपदकांसह 16 पदके जिंकली होती. या वेळी भारताने प्रथम 54 खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. त्यातील गोळाफेकपटू करनवीर सिंग प्रथम डोपिंगमध्ये अडकला, तर चारशे मीटरचा राष्ट्रीय विक्रमवीर महम्मद अनस आश्‍चर्यकारकरीत्या बाहेर पडला. प्रवीण चित्रावेल, जेस्विन अल्ड्रिन व रोहित यादव हे दुखापतीमुळे बाहेर पडले. सोमवारी रात्री जे दोन खेळाडू डोपिंगमध्ये अडकले, त्यापैकी एक चारशे मीटरची धावपटू अंजली देवी असल्याच्या वृत्ताला महासंघाच्या अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. दुसरी धावपटू भारतीय संघात नसून ती दक्षिणेतील आघाडीची स्प्रिंटर आहे.

Exit mobile version