आशियाई क्रीडा स्पर्धा; तर बजरंग पुनिया,फोगाटची माघार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने नियुक्ती हंगामी समिती आता पुढील महिन्याच्या सुरुवातीला जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन केले आहे. सर्व मल्लांना ही चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या चाचणीत विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना हार पत्करावी लागली, तर त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल असे हंगामी समितीच्या एका सदस्याने सांगितले.

बजरंग पुनिया (65 किलो) आणि विनेश फोगट (53 किलो) या दोघांनाही आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आला आहे. अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे तयारीसाठी या दोघांनीही सरावासाठी वेळ मागितला होता. मात्र, आशियाई ऑलिम्पिक परिषदेने भारताला संघ पाठविण्यासाठी मुदत वाढवून देण्यास नकार दिला होता. यानंतर हंगामी समितीने निवड चाचणीचे आयोजन करताना बजरंग, विनेशला थेट प्रवेश देण्याचा घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला होता.

बजरंग आणि विनेश यांना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीत विजय मिळवावा लागेल. या चाचणीत ते पराभूत झाले, तर त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी देखील पाठवले जाऊ नये. असा नवा प्रस्ताव हंगामी समितीसमोर ठेवला असल्याचे समितीमधील एक सदस्य ग्यानसिंग यांनी सांगितले. पुढील महिन्यात हाँगझाऊ येथे होणाऱ्या आशिया क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या हंगामी समितीने 18 विभागांसाठी निवड चाचणी घेतली.

आशिया क्रीडा स्पर्धेत संघात थेट प्रवेश देण्यावरून देशातील नवोदित मल्लांनी आम्हाला न्यायालयात उभे केले याचे एकीकडे दुःख झाले, पण हेच नवोदित मल्ल आपल्या हक्कासाठी लढत आहेत हे पाहून आनंदही झाला, असे मत बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी व्यक्त केले. हंगामी समितीच्या या निर्णयाविरोधात अंतिम पंघाल आणि सुजीत कलकाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु त्यांची याचिका फेटाळण्यात आली. बजरंग आणि विनेश दोघेही परदेशात सराव करत आहेत आणि तेथून त्यांनी एकीकडे ‌‘आसू’ आणि दुसरीकडे ‌‘हसू’ असे दुहेरी मतप्रदर्शन केले.
आम्ही चाचणीच्या विरोधात नव्हतो, आम्ही अंतिमला दोष देणार नाही, ती चुकीची नव्हती ती तिच्या हक्कासाठी लढत होती; तर आम्ही आमच्या हक्कासाठी लढा देत होतो. ती लहान आहे, त्यामुळे तिला इतक्या लवकर या प्रकरणातील गुंतागुंत कळणार नाही, त्यामुळे आम्हीही चुकीचे नव्हतो, असे विनेश म्हणाली. आम्ही यंत्रणेच्या विरोधात लढत आहोत. ही यंत्रणा फार बलवान आहे, जेव्हा आम्ही प्रहार झेलत होतो तेव्हा कोणीच पुढे आले नाही, अशीही भावना विनेशने व्यक्त केली.अंतिमला जर तिला फसवले आहे असे वाटत होते, तर तिने त्याच वेळेस न्यायालयात जायला हवे होते.

अखेरच्या क्षणी न्यायालयात गेल्यामुळे आम्हाला दुःख झाले. पण लहान वयातच या कुस्तीगीरांना आपल्या हक्कांची जाणीव झाली आहे आणि ते लढा देण्यास तयार होत आहे, हे भारतीय कुस्तीसाठी सुचिन्ह आहे असे विनेश म्हणते. या प्रकरणावर मी नंतर सविस्तरपणे बोलणार आहे. तीन चे चार मल्ल विनेशला सहज पराभूत करू शकतात असे अंतिम म्हणाली आहे, परंतु मला तिला सांगायचे आहे, विनेश अजून कोणाकडूनही पराभूत झालेली नाही आणि होणारही नाही. 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी तू पहिली भारतीय महिला आहेस असे सांगत असशील तर विनेशनेही दोन जागतिक पदके मिळवलेली आहेत. तू आमच्याविरोधात न्यायालयात जायला नको होतीस, असे बजरंगने सांगितले.

तो पुढे म्हणतो, आम्ही 20 वर्षे कुस्तीत घालवली आहेत, आम्ही आंदोलन करत असल्यामुळे कुस्तीच्या सरावापासून दूर आहोत, असे तुझे म्हणणे आहे, पण सर्वोत्तम कामगिरी करण्याची आमची भूक कायम आहे, कारकिर्दीच्या उच्च पातळीवर असताना आम्ही तसूभरही मेहनत आणि प्रयत्न कमी केले नव्हते.

Exit mobile version