आशियातील सर्वात मोठी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा

सावन बरवाल, अमरिता पटेल; अव्वलतब्बल 59,515 स्पर्धकांचा सहभाग


| मुंबई | प्रतिनिधी |

आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉन रविवारी (दि.21) पार पडली. पुरुषांमध्ये सावन बरवाल याने, तर महिलांमध्ये अमरिता पटेल हिने अव्वल स्थान पटकावले. या मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धावपटूसुद्धा सहभागी झाले होते. ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळची जगज्जेती पोल व्हॉल्टपटू केटी मून ही या टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 ची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर आहे. या मॅरेथॉनमध्ये एकूण 59,515 स्पर्धकांनी भाग घेतला.

42.195 कि.मी.ची मुख्य मॅरेथॉन ही पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी महारज टर्मिनस येथून सुरू झाली होती. 21.097 कि.मी.ची अर्ध मॅरेथॉन ही पहाटे 5 वाजता माहीम रेतीबंदर येथून सुरू झाली होती. तर 10 कि.मी.ची मॅरेथॉन सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुरू झाली.

टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन विजेते (21.097 कि.मी.)
प्रथम क्रमांकः सावन बरवाल
द्वितीय क्रमांकः किरण म्हात्रे
तृतीय क्रमांकः मोहन सैनी
विशेष म्हणजे हे तीनही विजेते इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत.
महिला हाफ मॅरेथॉन विजेते (21.97 कि.मी.)
प्रथम क्रमांकः अमरीता पटेल
द्वितीय क्रमांकः पूनम दिनकर
तृतीय क्रमांकः कविता यादव
Exit mobile version