कामोठ्यात ‘अस्मिता महाराष्ट्राची’ शताब्दी महोत्सव

दिशा महिला मंचाचा उपक्रम

| पनवेल/कामोठे | प्रतिनिधी |

सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामोठे येथील दिशा व्यासपीठाने 100 यशस्वी उपक्रमांचा गौरवशाली टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीचे औचित्य साधून आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गुरुवार दि.30 एप्रिल रोजी कामोठे येथील राधाई स्कूलमध्ये अस्मिता महाराष्ट्राची-2026 शताब्दी महोत्सव हा विशेष सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यात रॉयल महाराष्ट्र रनवे आणि रॉयल महाराष्ट्र गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची समृद्ध लोककला आणि ऐतिहासिक वैभव यांचा सुरेख संगम यावेळी उपस्थितांना अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या रॉयल महाराष्ट्र रनवेवर बालकलाकार आणि महिलांनी महाराष्ट्राच्या लोककलेचे बहारदार सादरीकरण केले. पारंपरिक आणि ऐतिहासिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करून या कलाकारांनी राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम या सोहळ्याचे वेगळेपण ठरले.

या सोहळ्याचे अनावरण आणि पुरस्कारांचे वितरण विधानपरिषद आमदार मा. विक्रांत पाटील आणि उपमहापौर प्रमिला पाटील, मा. विमल बिडवे (पोलीस निरीक्षक, कामोठे), इंदू झा, भूषण अरुणा अजित पोवळे, यांच्या हस्ते करण्यात आले.

100 उपक्रमांच्या यशस्वीतेमागे असलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते गौरव पोरवाल, डॉ. रुक्मिणी अर्जुन, डॉ. सुप्रिया वाकचौर तसेच मनिषा पाटील, जयश्री राठोड, राजश्री थोरात, मंदाकिनी पाटील, मा. जयकुमार डिगोळे, माधुरी पानसरे, अश्विनी ढोके, मा. अखिलेश जाधव, डॉ. श्वेता गजाभिये, डॉ. सुवर्णा चोपडे, निता माळी, सविता कदम, शर्वरी पाटणे, मा. देवदत्त घरत, मा. तुषार पाटील, मधुरा दंडवते, सुलक्षणा जगदाळे, मोहिनी पुजारी, डॉ. प्रांजली वैभव अंधारे आणि मिताली म्हात्रे, माधवी म्हात्रे यांचाही गौरव करण्यात आला. सामाजिक घडामोडींचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार बांधव साहिल रेळेकर, गौरव जहागिरदार, संजय कदम, रत्नाकर पाटील, अण्णासाहेब आहेर, गणेश कोळी, भालचंद्र जुमलेदार, संतोष आमले, अरुणकुमार मेहत्रे आणि नितीन देशमुख, गणेश जगताप यांचे यावेळी आभार मानून गौरविण्यात आले.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा निलम आंधळे यांच्यासोबत सावलीप्रमाणे खंबीरपणे साथ देणाऱ्या उपाध्यक्ष विद्या मोहिते यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. दिशा व्यासपीठाच्या सदस्य वाढीसाठी मदत करणाऱ्या सख्यांचा देखील यावेळी सन्मानचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमासाठी अन्य मान्यवर महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version