दामत-भडवल रस्त्यावरील डांबर उखडले

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील दामत गावातून भडवल गावाकडे जाणारा रस्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डांबरी पट्टे मारून तयार केला होता. गतवर्षी रस्त्याचे काम मंजूर होते आणि त्यानंतर रस्त्यावर खडीकरण तसेच डांबरीकरण झाले होते. कार्पेट डांबरीकरण पावसाळा सुरु होण्याआधी महिन्याचे करण्यात आले. दरम्यान, रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे केल्याने रस्त्यावरील डांबर उखडले आहे.

या रस्त्यावरील दामत गावातून भडवळ गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण काम मंजूर झाले होते. गतवर्षी या कामाचे भूमीपूजन कर्जतचे आमदार यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर महिन्याने या रस्त्याचे खडीकरण आणि बीबीएम डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. मात्र, रस्त्याचे कार्पेट डांबरीकरण करण्यात येत नसल्याने त्या रस्त्याच्या प्रश्‍नावर हाणामारीची घटनादेखील दामत येथील दोन गटांमध्ये झाली होती. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला सूचना करून रस्त्याचे डांबरीकरण पावसाळा सुरु होण्याआधी करण्यात आले. मात्र, रस्त्यावरून पाणी आणि सांडपाणी वाहत असल्याने रस्त्यावरील डांबर तात्काळ निखळले आणि रस्त्यात खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्त्याची अवस्था दयनीय असल्याने वाहनचालकांना प्रवास करणे कठीण होऊन बसले आहे.

दरम्यान, ठेकेदार हा लोकप्रतिनिधी यांच्याशी संबंधित असल्याने चांगल्या दर्जाचे काम करून घेण्यावर शासकीय अधिकार्‍यांचे नियंत्रण नव्हते. परिणामी, दामत-भडवळ रस्त्याचे डांबरीकरण अवघ्या अडीच महिन्यात निखळले, असा आरोप भडवळ गावातील ग्रामस्थांचा असून, या नित्कृष्ट दर्जाच्या कामाबद्लल संताप व्यक्त केला आहे.

Exit mobile version