चार फाटा रस्त्याचे डांबरीकरण सुरु

। उरण । वार्ताहर ।
उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील चार फाटा रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व सुशोभीकरण करण्यात यावे असे आदेश पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सिडकोच्या अधिकारी वर्गाला दिले. सिडकोच्या अधिकारी वर्गाने तात्काळ पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून उरण चार फाटा सर्कल रस्त्याचे नव्याने डांबरीकरण सुरु झाले आहे. चार फाटा रस्त्याचे काम हे मागील वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे सदर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने पावसाळ्यात प्रवाशी नागरीक, वाहन चालक याना अनेक समस्यांचा सामना करत प्रवास करावा लागणार आहे. तरी सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम सिडकोने हाती घ्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी केली. सदर रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभीकरणाचे काम हे नवीमुंबई परिसरातील नावाजलेली कंपनी करत असल्याने प्रवाशी नागरीक, वाहन चालक यांनी समाधान व्यक्तकेले जात आहे.

Exit mobile version