| आपटा | वार्ताहर |
गेल्या आठवड्यात रसायनी फाटा व आपटा फाटा या रोडवरील जे डांबरीकरण केले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्या आलेले आहे. डांबरीकरण होऊनही या मार्गावर अजूनही खड्डे आहे तसेच आहेत. याचा वाहनचालकासंह नागरिकांनाही प्रचंड त्रास होत आहे. डांबरीकरण करताना वर टाकलेल्या बारीक खडीवर डांबर टाकले की नाही हेच कळत नाही. यामुळे परिसरातील नागरिक, वाहनचालक कमालीचे संतप्त झालेले आहेत.
याबाबत रसायनी पत्रकार संघानेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या पाच वर्षात या रस्त्यावर कसलेही डांबरीकरण अथवा दुरुस्तीचे कामच झालेले नाही. आता फक्त दिखाव्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु असल्याचा आरोपही नागरिकांनीह केली आहे. निदान आगामी काळात तरी रस्त्याचे कामे चांगले करावे, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.