| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड-आगरदांडा रस्त्याच्या डांबरीकरण काम वेग आला असून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या साळाव-मुरुड-आगरदांडा रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्यावर बोर्ली स्टॅण्ड व नांदगाव सुरळपेठ एस.बी.आय. एटीएम ते बेंगलोर बाजार दरम्यान पावसाळ्यात पावसाचे पाणी भरण्याची शक्यता लक्षात घेऊन काँक्रिटीकरण करण्यात आले असून साळावपासून ते बारशिवपर्यंत डांबरीकरण पूर्ण होत आले आहे.
साळाव-मुरुड-आगरदांडा रस्त्याच्या अनेक वर्षांपासून असलेल्या दुरावस्थेमुळे वाहन चालक व प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात होऊन साळावपासून बारशिवपर्यंत डांबरीकरण पूर्ण होत आले असून लवकरात लवकर साळाव -मुरुड-आगरदांडा रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.