। आगरदांडा । वार्ताहर ।
शिवसेनेचे नगरविकास मंत्री -एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला होता. तर शिंदे समर्थक हे वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत होते. परंतु राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर मुरुड शहरातील नाक्यावर शिंदे समर्थकांनी फटाके फोडत आनंद साजरा करत उघडपणे शिंदे समर्थक असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुरुड जंजिरा नगरपरिषदेची निवडणूक काही महिने लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली असली तरी पडद्यामागे इच्छुकांच्या जोरदार हालचाली सुरू करून निवडणूकीच्या अनुषंगाने बांधणी केली आहे.मात्र राज्यातील नाट्याने आखलेल्या गणितांची आकडेमोड झाली आहे.
आता शिवसेनेचे असणारे निवडणूकीतील धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कडे राहणार की एकनाथ शिंदे यांच्या कडे जाणार याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.त्यामुळे बड्या नेत्यांनी जरी उघडपणे पाठिंबा दर्शवला असला तरी शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेदवाराचं काय होणार, शिवसेनेचे इच्छुक उमेदवारांकरिता निवडणूकीच्या वेळी एबी फॉर्म कोण देणार, हे महत्त्वाचे असल्याने शिवसेनेचे असणारे इच्छुक उमेदवार संभ्रमात आहे. आता सर्वांच्या नजरा 12 जुलैच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे असणार आहे. त्यामध्ये अनेक शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांसह कार्यर्कत्यांची भूमिका स्पष्ट होईलचं परंतु नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता प्रभाग 10 असुन प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दयाचे आहेत.त्या बरोबर नगरसेवकांची संख्येत वाढत होतं असुन 17 वरून 20 होणार आसणार आहे. दरम्यान नगरसेवकांची संख्या वाढविल्याने राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी देणे शक्य होणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीचा सरकार कोसळला तरी महाविकास आघाडी आजुन पर्यंत भक्कम आहे हे विधानसभा अध्यक्षेच्या निवडणूकीत दिसुन आले. ही आघाडी नगरपरिषदे करिता दिसुन येईल का? हे सांगता येत नाही.मागील झालेल्या जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत ही महाविकास आघाडी टिकावण्यास तीन ही पक्ष अपेक्षी ठरले होते.त्यामुळे प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत.