तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
ऑफिसमध्ये झालेल्या किरकोळ वादावरून एकाला बांबू आणि पेवर ब्लॉकच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अविनाश गुरुनाथ राठोड (रा. कुकशेत, नेरूळ), रितेश गुरुनाथ राठोड (रा. नेरूळ) आणि अंश समीर हांडे (रा. सेक्टर 19, उलवे) यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
योगेंद्र चौधरी (30) हा खारघर सेक्टर 12 येथे राहत असून त्यांच्या कंपनीत रोहन चव्हाण आणि अविनाश राठोड हे काम करतात. 16 मार्च रोजी रोहन चव्हाण हा कारने जात होता. यावेळी ऋतुराज तिवारी हा गाडीत होता. अविनाश राठोड हा त्याचा भाऊ रितेश राठोड चालवत असलेल्या बुलेटवर मागे बसला. तर अंश हांडे हा दुसरी दुचाकी चालवत होता. त्यावेळी रोहन चव्हाण याच्या चार चाकी गाडीला खुटारी गावच्या कमानीच्या समोरील रस्त्यावर ओव्हरटेक करून त्याची गाडी थांबवण्यात आली. अविनाशने रोहनला ऑफिसमध्ये झालेल्या किरकोळ वादावरून बाहेर खेचून बांबू आणि पेवर ब्लॉकच्या साहाय्याने मारहाण केली. या मारहाणीत रोहन गंभीर जखमी झाला असून त्याला खारघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.







