| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
लाकडी फळीने मारहाण केल्या प्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 9 ऑक्टोबर रोजी जयराम तुकाराम पाटील आणि स्वप्निल जयराम पाटील यांनी त्यांच्या पाण्याच्या नळाला प्रेशर मोटर लावून पाणी भरल्याने राजेंद्र तुकाराम पाटील (54) राहणार सांगडे यांच्याकडे पाणी येत नव्हते याचा जाब जयराम आणि स्वप्निल यांना विचारला असता त्याचा त्यांना राग आला आणि त्या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जयराम पाटील यांनी लाकडी फळी राजेंद्र यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.
लाकडी फळीने केली मारहाण, दोघां विरोधात गुन्हा
