| न्यूयॉर्क | वृत्तसंस्था |
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार आहेत. सुनीता आणि बुच हे दोघेही आता स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परततील. दोघांनी गेल्या वर्षी 5 जून रोजी केप कॅनवेरल येथून बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले. ते आठ दिवसांच्या मिशनसाठी गेले होते. मात्र, अंतराळ यानामधून हीलियमची गळती आणि वेग कमी झाल्यामुळे ते जवळपास नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकले आहेत. त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाची सर्वांनाच आतुरता होती. अखेर आता ते पृथ्वीवर परत येणार आहेत.
अमेरिकन अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि बुच विल्मर यांना घेऊन एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे स्पेसक्राफ्ट ड्रॅगनचा पृथ्वीकडे प्रवास सुरु झाला आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रापासून स्पेसक्राफ्ट अनडॉक झाले आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी पहाटे साडे तीन वाजता ते पृथ्वीवर पोहोचेल. सुनिता विलियम्स, बुच विल्मर, निग हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव देखील परत येत आहेत. सुनिता विलियम्स आणि बुच विल्मर जून महिन्यापासून अंतराळात अडकले होते. नासा आणि आणि स्पेसएक्स कडून प्रयत्न करत त्यांना परत आणले जात आहे. त्यांच्यासोबत निग हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव देखील परत येणार आहेत. नासाने सुनिता विलियम्स यांच्या परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जारी केले आहे. वातावरणातील बदलामुळे यामध्ये बदल होऊ शकतो. साधारणपणे हा प्रवास 17 तासांचा असेल.
सुनिता विलियम्स यांना घेऊन स्पेसएक्सचं ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आज सकाळी 10.35 वाजता अनडॉकिंग सुरु झाले आहे. अनडॉकिंगची प्रक्रिया ऑटोमेटिकपणे पार पडली.
1. स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये दाखल होण्यापूर्वी अंतराळवीरांनी प्रेशर सूट परिधान केले. त्यानंतर हॅच बंद करण्यात आला. त्यानंतर लिकेजची पडताळणी झाली.
2. दुसऱ्या टप्प्यात स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्ट अनडॉकिंग करण्यात आले. अनॉकिंगची प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये पार पडली. यामध्ये सुरक्षा चाचणी, त्यापूर्वी स्पेसक्राफ्टमधील लाइफ सपोर्ट सिस्टीम, कम्युनिकेशन आणि थ्रस्टर सिस्टीमची कार्यपद्धती तपासली जाते. दुसऱ्या टप्प्यात स्पेसक्राफ्टचं लॉक काढण्यात आले. स्पेसक्राफ्ट आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जोडणाऱ्या गोष्टी खुल्या केल्या जातात. तिसऱ्या चरणात अनडॉकिंग सिस्टिम खुली झाल्यानंतर थ्रस्टर स्पेसक्राफ्ट आयएसएसपासून वेगळे करण्यात आले. थ्रस्टरकडून स्पेसक्राफ्टचे स्पीड आणि दिशादर्शन नियंत्रित केले जाते. चौथ्या टप्प्यात अनडॉकिंग करण्यात आल्यानंतर स्पेसक्राफ्ट नियंत्रित केले गेले. यानंतर स्पेसक्राफ्ट पूर्णपणे आयएसएसपासून वेगळं होऊन पृथ्वीच्या दिशेने रवाना झाले.
डीऑर्बिट बर्न : या दरम्यान स्पेसक्राफ्टचं डीऑर्बिट बर्न सुरु होईल. याचे बर्निंग बुधवार 2.41 वाजेपर्यंत सुरु राहील. यानुसार इंजिन फायर केले जाईल. यामुळे स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या दिशेने पोहोचेल.
धरतीवर वायूमंडळात प्रवेश : स्पेसक्राफ्टचे एअरक्राफ्ट 27000 किलोमीटर प्रतितास वेगानं पृथ्वीच्या दिशेनं वायूमंडळात प्रवेश करेल.
पॅराशूट खुली होणार : पृथ्वीपासून 18 हजार फूट ऊंच अंतरावर सर्वप्रथम दोन ड्रॅगन पॅराशूट ओपन होतील. त्यानंतर 6000 फूट ऊंचीवर मुख्य पॅराशूट खुले होईल.
स्प्लॅशडाऊन : नासाच्या माहितीनुसार स्प्लॅशडाऊन किंवा अंतराळवीरांचे लँडिंग समुद्र किनाऱ्यावरील फ्लोरिडाच्या तटावर होईल. वातावरणीय अडचण आली नाही तर लँडिंग 3.27 वाजता होईल.