पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक पर्पल कलरचा

| पॅरिस | वृत्तसंस्था |

पॅरिस ऑलिम्पिकमधील ट्रॅक यावेळी जांभळ्या रंगाचा असेल. साधारणपणे ट्रॅक लाल रंगात असतो. टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील ट्रॅकचा रंग लाल होता.

माजी ऑलिंपियन आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील ऍथलेटिक्स स्पर्धेचे प्रभारी एलेन ब्लोंडेल यांनी सांगितले की, ट्रॅक जांभळा रंग देण्याचे कारण म्हणजे जांभळा हा पॅरिस ऑलिम्पिक खेळांच्या रंगांपैकी एक आहे. अलीकडेच ऑलिम्पिक संघटनेने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तीन रंगांची निवड केली होती. ज्यामध्ये गुलाबी, निळा आणि जांभळा रंगांचा समावेश होता.

पॅरिस ऑलिम्पिकच्या ऍथलेटिक्स ट्रॅकचे साहित्य इटलीमध्ये तयार करण्यात आले आहे. 1976 पासून ऑलिम्पिकसाठी ट्रॅक तयार करणार्‍या मोंडो या कंपनीचा विश्‍वास आहे, की हे ट्रॅक पूर्वीपेक्षा चांगले असतील. त्यामुळे खेळाडूंना त्यांची कामगिरी सुधारण्यास मदत होईल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये तीन विश्‍वविक्रम आणि 10 ऑलिम्पिक विक्रम झाले. पॅरिस ऑलिम्पिकमधील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या प्रभारी एलेन ब्लोंडेल यांनी सांगितले की, टोकियोपेक्षा पॅरिसमध्ये अधिक विक्रम केले जातील. पॅरिस ऑलिम्पिक (दि.26) जुलै ते (दि.11) ऑगस्ट दरम्यान होणार आहे. टोकियोमध्ये भारताला प्रथमच ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळाले. नीरज चोप्राने ऑलिम्पिक ट्रॅक आणि फील्डमध्ये भालाफेकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले.

Exit mobile version